न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२५) :- वाकड येथील मुंबई-पुणे हायवेलगत सुर्या अंडरपास ब्रिज खाली दोघांनी बेकायदेशिररित्या विक्रीकरीता एकुण ६८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जवळ बाळगला.
त्या बरोबरच गुन्हयात वापरलेला ०२ मोबाईल आणि ०१ मोपेड टु व्हीलर गाडी असा एकुण ७,५०,०००/- किं.चा मुद्देमाल कारवाई दरम्यान पोलीसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी नरेश अनंतराव बलसाने, सहायक पोलीस उप निरीक्षक नेमणुक हिंजवडी पोलीस स्टेशन यांनी आरोपी १) अक्षय पप्पु देडे वय २८ वर्षे, रा. रामटेकडी हडपसर, २) राहुल सनी देवरे (वय-२२ वर्षे, रा. रामटेकडी हडपसर) या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.
















