न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२५) :- बिल्डींग साईटवरील १६ व्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यु झाला आहे.
बांधकाम ठेकेदाराने संरक्षणाचे साधने देणे बंधनकारक असताना देखील ते न देता काम करण्यास सांगत निष्काळजीपणा तसेच हलगर्जीपणा केला.
त्यांच्या निष्काळजीपणाच्या कृतीमुळे हा प्रकार घडला, असं फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीचे काका रंजीत पुरण पुजहर व त्यांचा जोडीदार मजुर बिशु अनिल बार यांचा मृतात समावेश आहे. हा प्रकार वर्धमान स्काय टाऊन, गोडांबे चौक, रहाटणी येथे घडला. याप्रकरणी सहदेव अर्जुन राय यांनी आरोपी ठेकेदार राजेश वनमाळी सोळंकी यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















