- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२५) :- नागरिकांची फसवणूक करणारे पाच अनधिकृत लोन अॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांना यश आले आहे. या अॅप्सद्वारे फसवणुकीच्या तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात येत होत्या.
या अॅप्सकडे आरबीआय, सेबीची अधिकृत परवानगी नसल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांनी गूगलशी संपर्क साधून क्रेडिट लेन्स, रॅकफ्टा, आरपीएमटीए, क्रेडिट पायलट आणि रेबा रोख हे पाच अॅप्स हटवले आहेत.
की क्रेडिट, एससी एलिट व्हीआयपी, लुमेनमॅक्स, रूपांतरण या अॅप्ससाठी पत्रव्यवहार सुरू आहे. लोन अॅप्स वापरण्यापूर्वी ते नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.