- तब्बल दहा महिन्यांपासून सुरू होता लैंगिक छळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बीड (दि. २८ जून २०२५) :- एका खासगी क्लासेसमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीला नग्न करून फोटो काढले. हा त्रास असह्य झाल्याने ती १५ दिवसांपासून जेवलीही नाही. रात्री अचानक दचकून जागी व्हायची. हा प्रकार पाहून आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.
३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. यामुळे पीडिता तणावाखाली होती. हे पाहून पालक अभ्यासाचा ताण असेल या हेतूने विजय पवार याच्याकडे विचारण्यास गेल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालकांनी मुलीलाच विश्वासात घेत विचारणा केली. त्यानंतर तिने हे सर्व वास्तव सांगितले. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्याची माहिती होताच विजय पवार व प्रशांत खाटोकर हे आरोपी फरार झाले. रात्रभर १०० पोलिसांचा फौजफाटा त्यांचा शोध घेत होता. हे दोन्ही आरोपी एका व्यक्तीच्या वाढदिवसालाही हजर होते. प्रशांत खाटोकरची पत्नी आणि वडील या दोघांनाही चौकशी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दिवसभर बसविण्यात आले होते.
आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच क्लासेसजवळ गुन्हा दाखल होताच बंदोबस्त तैनात केला आहे.
– किशोर पवार, पोलिस निरीक्षक, बीड…