न्यूज पीसीएमसी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर (दि. 28 जून 2025) :- छत्रपती संभाजीनगर येथे महिला किर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
ह. भ. प. संगीताताई महाराज असं हत्या झालेल्या कीर्तनकार महिलेचं नाव आहे. त्या वैजापूर इथं एका आश्रमात राहत होत्या. २७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने आश्रमात घुसून त्यांची हत्या केली. आरोपीनं अमानुषपणे त्यांच्या डोक्यावर दगडाने अनेक प्रहार केले. हे वार इतके गंभीर होते की, या हल्ल्यात संगिताताई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं.