न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 28 जुन 2025) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळा दिनांक १६ जून रोजीपासून उत्साहात सुरु झाल्या. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुध्दा करण्यात आले.
सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमातून शालेय व आवश्यक साहित्यांचे वाटप सुरु केले असून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला असून शाळांकडून साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने, डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येऊन सदर प्रक्रिया जलदपणे राबविण्यात येत आहे.