न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२५) :- खान्देशवासीयांचे आराध्य दैवत कानबाई माता सार्वजनिक उत्सवानिमित्त बिजलीनगर शिवनगरी येथील तुळजाभवानी मंदिरात नुकतीच महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या व पिंपरी चिंचवड, पुणे,चाकण व मावळ परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सर्व समाज खान्देशी कुटुंबियांना कानबाई उत्सवात सहभागी होता यावे व सदरचा धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडावा याकरिता समस्त खान्देश समाज बांधव व भगिनी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
बैठकीत खान्देशातील मराठा समाज बांधव, लेवा समाज बांधव, गुजर समाज बांधव, राजपुत समाज बांधव,बौद्ध समाज बांधव, सोनार समाज बांधव, तेली समाज बांधव, माळी समाज बांधव,न्हावी समाज बांधव, शिंपी समाज बांधव, ब्राह्मण समाज बांधव, गुरव समाज बांधव,वाणी समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव, बारी समाज बांधव, कोळी समाज बांधव,वंजारी समाज बांधव,डोरीक समाज बांधव,लोहार समाज बांधव, सुतार समाज बांधव,कुंभार समाज बांधव समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व समाज मंडळातील सदस्यांनी सदरचा कार्यक्रम राजकीय व व्यक्तिगत संयोजनाने न होता लोकवर्गणीतून, सर्व समाज समावेशक सहभागाने व पक्ष व राजकारण विरहित साजरा व्हावा असे एकसुराने स्पष्ट केले. सदरचा श्री कानबाई माता उत्सव हा पूर्णतः खान्देशी अस्मिता,धार्मिकता व आस्था या त्रिसूत्री वर साजरा होत असल्याने कोणत्याच राजकीय पक्षाचा एककलमी झेंडा उत्सवात फडकला जाऊ नये याची काळजी देवी भक्तांनी घेण्याचे बैठकीत अंतिम करण्यात आले.
बैठकीत महिला भगिनी रजनी वाघ,पुनम पाटील,कल्पना बागुल, देवयानी पाटील उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे डॉ.विजयकुमार पाटील, गुलाबराव पाटील सैदाणे, संदीप जगताप, रवींद्र माळी,राहुल पाटील,स्वप्निल चौधरी,ज्ञानेश्वर पाटील, विनोद चौधरी,सचिन चौधरी,सचिन माळी, राजू देशमुख,समाधान पाटील, सागर पाटील,सतिश सैदाने,विशाल जगदाळे,राहुल पाटील चंद्रकांत सैदाणे, योगेश देशमुख,प्रशांत महाजन,मनोज सैंदाणे, ईश्वर महाजन,संजीव पाटील,दत्त ढोणे, राजीव पाटील,साहेबराव देसले, राजू भोकटे,बलित पवार,प्रवीण राजपूत, रोहन महाजन,यादवसिंग पाटील, राहुल सयाणे, एकनाथ सोनवणे,मोतीलाल पाटील, योगेश चौधरी,प्रज्वल पाटील,राजेंद्र निकम,दाजी पाटील, गणेश जाधव,मनोहर पाटील, संदीप पाटील,जयेश पाटील, योगेश सोनवणे, सौरभ पाटील,देवेंद्र पाटील,कोमल पाटील, माऊली जगताप उपस्थित होते.
येत्या काही महिन्यातच महापालिका निवडणुकीची शक्यता असल्याने अनेक राजकिय मंडळी अश्या धार्मिक कार्यक्रमात मुक्तहस्त संयोजन व आयोजन करण्यास अग्रेसर असतील. अश्या मंडळींना श्री कानबाई माता धार्मिक उत्सवात विशेष अग्रक्रम देण्याची आवश्यकता नाही. देवी भक्त व समाज बांधव म्हणून त्यांचे स्वागत मात्र नक्कीच असणार आहे.
– डॉ. विजयकुमार पाटील (अखिल भारतीय खान्देश मंच)
श्री कानबाई माता उत्सव हा एका पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा नसून तो सार्वजनिक धार्मिक उत्सव असून सर्व समाज मंडळांचा सहभाग असणारा पारंपरिक सण आहे.
-गुलाबराव पाटील (अध्यक्ष – खान्देश मराठा मंडळ)
श्री कानबाई माता सर्व खान्देशवासीयांचे कुलदैवत असून.ते कोणा एका मंडळाचे किंवा व्यक्तीचे आराध्य नाही. राजकीय उद्देश बाजूला ठेवून मतभेद न करता सदरचा उत्सव आपण एकत्रित साजरा करूया.
– कल्पना बागुल (सामाजिक कार्यकर्त्या)
सर्वसमावेशक व योग्य सूचनांचा आदर ठेवून श्री कानबाई माता उत्सव साजरा करण्यात येईल. सर्व कानबाई माता भक्तांना महोत्सवातील धामिर्क कार्यक्रमात सहभागी करून घेऊन कार्याची जबाबदारी दिली जाईल.
– मोतीलाल पाटील (खान्देश मराठा मंडळ – संचालक)
सर्वांच्या एकविचाराने व सहभागाने आपल्याला हा कानबाई धार्मिक उत्सव संपन्न करावयाचा आहे.काही कानबाई माता उत्सवाच्या नावाखाली राजकीय इव्हेंट राबविताना दिसून येतील.त्याकडे कानाडोळा करून “सार्वजनिक” कानबाई उत्सवात सहभाही व्हायचे आहे.
– एकनाथ सोनवणे ( सामाजिक कार्यकर्ते)
मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीचे ओटीभरण होईल व देवीला आमंत्रण दिले जाईल.समस्त खान्देश बांधव कुटुंबीयांनी हजर रहावे.समाजातील सर्व क्षेत्रातील खान्देश बांधव हेच श्री कानबाई माता उत्सवाकरता आयोजक राहतील. कार्यक्रमासाठी आर्थिक जबाबदारी मी स्वता व प्रमोद चौधरी बैठकीत ठरल्याप्रमाणे पार पाडू.
-माऊली जगताप (खान्देश युवा महासंघ – अध्यक्ष)
श्री कानबाई माता उत्सव श्रावण मासातील महत्वपूर्ण सण असून खान्देशी महिलांचा मोठा सहभाग ह्या वर्षी या “सार्वजनिक” कार्यक्रमात असणार आहे.
-पूनम पाटील (सामाजिक कार्यकर्त्या)
खान्देशी समाज बांधव कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या दबावाला बळी पडणार नाही. वैयक्तिक संयोजनापेक्षा “सार्वजनिक” उत्सवासाठी सर्व समाज बांधवांचे आयोजन महत्वाचे ठरेल.
– मनोहर पाटील ( सामाजिक कार्यकर्ते)
राजकीय जोडे बाजूला सारून प्रत्येक “लोकप्रतिधिनी” समाज बांधवांच्या संयोजनाखाली श्री कानबाई माता उत्सवात सामील व्हावे.
– देवयानी पाटील (सामाजिक कार्यकर्त्या)
















