- आजपासून सांडव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडणार..
- नदीकाठच्या नागरिकांनी सावध रहावे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. 05 जुलै 2025) :-पवना धरण सद्यस्थितीमध्ये 72 टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.
दरम्यान धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता आज शनिवारी दुपारी 12:00 वाजले पासून सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने मुक्त विसर्ग करण्यात आला आहे.
प्रथम सांडव्यावरील विसर्ग 400 क्युसेक्स इतका राहणार असून, सदरील विसर्ग हा दि. 15/07/2025 पर्यंत चालू राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे.
कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.