न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०७ जुलै २०२५) :- गेल्या आठवड्यात १ जुलैपासून रेल्वे आरक्षण प्रणाली आणि तत्काळ तिकिटाच्या नियमात रेल्वे बोर्डाकडून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता गुरुवार (दि. १०) पासून रेल्वे प्रवाशांनी काढलेल्या तिकिटाचे आरक्षण निश्चत झाले की नाही, हे आठ तास अगोदर समजणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मध्य रेल्वे झोनमधील सर्व रेल्वे विभागांना आरक्षणाचा चार्ट आठ तास अगोदर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्व गाड्यांसाठी आरक्षण चार्टची मॅन्युअल लागू करण्यात येणार आहे. सुधारित चार्टच्या वेळापत्रकानुसार ज्या गाड्या पहाटे ५:०० ते दुपारी २:०० दरम्यान धावतील, त्यांचा चार्ट आदल्या दिवशी रात्री ९:०० वाजेपर्यत तयार होणार आहे. ज्या गाड्या दुपारी २:०० ते रात्री ११:५९ दरम्यान धावणार आहेत, त्यांचा चार्ट गाडी निघण्याच्या किमान ८ तास आधी तयार होणार आहे. तसेच ज्या गाड्या रात्री १२:०० ते पहाटे ५:०० दरम्यान धावणार आहेत, त्यांचाही चार्ट गाडी निघण्याअगोदर किमान ८ तास आधी तयार होणार आहे. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना फायदा होणार असून, ऐन वेळी निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. शिवाय प्रवास करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे.
पूर्वी चार तास आधी आरक्षण कळायचे, त्यामुळे दूरवरून येणाऱ्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले नसेल, तर प्रवास अवघड व्हायचा. आता याचा प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना फायदा होणार असून, ऐन वेळी निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. शिवाय प्रवास करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे.
या आधी चार तास अगोदर आरक्षण चार्ट तयार करण्यात येत होते. त्यामुळे वेटिंग प्रवाशांना तिकीट कन्फर्म झाले आहे की, नाही हे उशिरा समजत होते. त्यामुळे प्रवासाला निघताना अडचणी येत होत्या. आता आठ तास अगोदर चार्ट तयार होणार आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग…
















