न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०७ जुलै २०२५) :- एका महिलेला फसवून बनावट सीबीआय अधिकारी, सुप्रीम कोर्ट न्यायाधीश अशी बतावणी करून २१ लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर परिसरात २६ जून ते ४ जुलै दरम्यान घडली.
मोबाइल ८६४५५९५३२७ ट्रॉयड डिपार्टमेंट (अनोळखी इसम), मोबा. ९३६५८५६८१६, प्रदीप सावंत (खरे नाव व पत्ता माहिती नाही), संदीप रॉय (खरे नाव व पत्ता माहिती नाही), के. शीवा सुब्रमन्यम, सीबीआय डायरेक्टर (तोतयेगिरी), सुप्रीम कोर्ट न्यायाधीश (तोतयेगिरी), द जिन्स शॉप व ए टी कर्नावल या नावाचे खातेधारक अकाऊंट नं. २०१०००७४३३२८ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ५) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून ते ४ जुलै दरम्यान फिर्यादीला ट्रॉय डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा वापर करून सिम काढल्याची माहिती दिली. या कार्डवरून अश्लील मजकूर व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक होईल अशी धमकी देण्यात आली. सीबीआय, सुप्रीम कोर्टच्या नावाने धमकी देत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. खात्यातील रक्कम डिजिटल चलन व्हेरिफाय करण्याचे कारण सांगून २१ लाख रुपये फसवून घेतले. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
















