न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. ०८ जुलै २०२५) :- आधार कार्ड बनविण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक करण्याचा निर्णय यूआयडीएआयने घेतला आहे. वर्ष २०२५-२६ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. विदेशी नागरिकांसाठी मात्र नियम वेगळे आहेत.
‘एका व्यक्तीला एकच आधार कार्ड’ हा नियम करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यास पहिले आधार कार्ड वैध ठरवून नंतरची कार्डे रद्द केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.
कोणते दस्तऐवज वैध?..
भारतीय पासपोर्ट (ओळख, पत्ता, नातेसंबंध व जन्मतारीख यांसाठी मान्य), पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, ड्रायव्हिंग लायसेन्स, पेन्शन कार्ड, कोणतेही सरकारी प्रमाणपत्र.
















