न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२५) :- महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची बदली झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वाहतूक व परिवहनच्या नगर रचना विभागाच्या उपसंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या नगर विकास विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढले.
महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची नियुक्ती दोन वर्षापूर्वी झाली होती. गायकवाड यांच्या कालखंडात महापालिकेचा विकास आराखडा महापालिकेस सादर झाला आहे. त्यांच्याविरोधात महापालिका भवनासमोर आंदोलने झाली होती.
नगर विकास विभागातील पाच उपसंचालकांच्या बदल्या झाल्या. त्यात गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. गायकवाड यांची छत्रपती संभाजीनगर येथील वाहतूक व परिवहन विभागातील नगर रचना विभागातील उपसंचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्याच्या नागरी संशोधन घटक विभागातील संचालक किशोर विष्णू गोखले यांची नियुक्ती झाली आहे.
















