न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०९ जुलै २०२५) :- दुकान चालवायचे असेल तर दरमहा १२०० रुपये खंडणी म्हणून पैशाची मागणी केली. जबरदस्तीने १,००० रुपये ऑनलाईन घेतले. तसेच कोयता फिरवून परिसरात दहशत माजवली.
दहशतीमुळे फिर्यादी घाबरले. फिर्यादीकडुन आरोपीने आतापर्यंत २०,२०० रुपये रोख किंवा ऑनलाईन पैसे खंडणी स्वरूपात घेतले आहेत, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील इलेक्ट्रीकल्स आणि गॅस रिपेअर्सच्या दुकानात घडला.
याप्रकरणी पांडुरंग बिरादार (धंदा व्यवसाय) यांनी आरोपी शिवशंकर ऊर्फ दाद्या संभाजी राक्षे (वय ३२ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोसरी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
















