न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०९ जुलै २०२५) :- घरासमोर येवून काहीएक कारण नसताना आरोपीने शिवीगाळी केली. पोलीस बोलावल्याचे सांगताच निघून जाऊ लागल्याने त्यास थांबविले असता त्याने फिर्यादीशी वाद घातला.
‘तु पोलिसांना बोलवितो का, तुला माज आलाय, तुला आत्ताच्या आत्ता खतम करुन टाकतो’ असे म्हणुन पॅन्टच्या खिशातून ब्लेडपान काढून फिर्यादीच्या हनुवटीवर व कपाळावर जोरात वार केला.
फिर्यादी रिक्षाचालक यांना गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. टु व्हिलरला लावलेला कोयता काढुन “मी ईथला भाई आहे, तुम्हाला जिवंत सोडणार नाही.” अशी धमकी देवुन हातातील कोयता हवेत फिरवुन दहशत निर्माण करुन पळुन गेला, अस फिर्यादीत नमुद आहे.
हा प्रकार (दि ०७) रोजी गणराज कॉलनी, आदर्शनगर काळेवाडी येथे घडला.
मधुकर विष्णु तमाके (काळेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रेमऊर्फ सोन्या बालाजी पोतदार ( वय २३ वर्षे अंदाजे रा. सांगवी) याच्या विरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
















