- घटनास्थळावरून वाहन चालक फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे (दि. १० जुलै २०२५) :- तळवडे येथील कॅनबे चौकामधील अग्निशामक ऑफीसच्या गेट समोर एका अज्ञात वाहनाने ओला दुचाकीला धडक दिली. यात २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. प्रतिक वाबळे असं मयत तरूणाच नाव आहे. ही घटना (दि ०९) रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मयताचे वडील राजकुमार वाबळे (वय ५५ वर्षे रा. तळवडे) यांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. देहूरोड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान फिर्यादी यांचा मयत मुलगा प्रतिक हा त्याच्या ओला दुचाकी वरून जात होता. कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचे ताब्यातील वाहन हे बेदरकारपणे धोकादायकरित्या, अतिवेगाने, निष्काळजीपणाने चालवुन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मुलाच्या दुचाकीला धडक देवुन त्यांच्या मुलाच्या मुत्युस कारणीभुत होवुन त्यास कोणतीही वैद्यकीय उपचाराची मदत न करता तेथून निघून गेला आहे, अस फिर्यादीत नमुद आहे.











