न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२५) :- चिंचवडगावातील दिलीप सोनिग्रा ज्वेलर्सची तरूणाकडून फसवणुक करण्याची घटना घडली आहे. हा प्रकार (दि. २७ /०६/२०२५) उघडकीस आला. याप्रकरणी श्रीपाल सोनिग्रा यांनी आरोपी राकेश भवानजी पासद (नानेचौक, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याचेकडील १६.३४० ग्रॅम वजनाची सोन्याचा लेप असलेली तांब्याची चैन ही २२ कॅरेट सोन्याची असल्याचे भासवले.
चैन गहाण ठेवुन फिर्यादी यांच्या दुकानातुन १,००,०००/- रुपये घेवुन जावुन त्यांची फसवणुक केलेली आहे.











