- ट्रकमधील लोखंडी पाईप कार आणि दुचाकीवर धडकले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खोपोली (दि. १५ जुलै २०२५) :- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला ठार झाल्या आहेत, तर चौघे गंभीर जखमी असल्याची माहीत समोर आली आहे.
जुन्या मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेल्प फाउंडेशनसह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, खोपोलीच्या बोरघाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने एचओसी ब्रीजजवळ अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले. या अपघातात कारमधील एक आणि दुचाकीवरील एक महिला ठार झाली. तर चौघे जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेल्प फाउंडेशन सह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र या अपघातातील चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती नाजुक असल्याचे ही बोललं जात आहे.
















