- सातबारा उताऱ्यावरील फेरफार नडला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पवनानगर (दि. १७ जुलै २०२५) :- मावळ तालुक्यातील शिवणे येथील मंडल अधिकारी मारुती महादेव चोरमले (वय ५३) आणि त्याचा हस्तक जयेश बाळासाहेब बारमुख (३३, रा. चांदखेड, मावळ) यांना दोन लाख १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरीतील स्पाईन रोडवरील एका रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. १५ जुलै) ही कारवाई केली.
तक्रारदाराच्या बहिणीने आणि इतर २१ जणांनी मिळून कुसगाव (ता. मावळ) येथील ३८ गुंठे जमीन बांधकाम व्यावसायिक पूर्णचंद्र सनातन स्वाईन यांच्याकडून विकसन कराराद्वारे घेतली होती. परंतु त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने हीच जमीन दुसऱ्याला विकली. दुसऱ्या व्यक्तीने सातबारा उताऱ्यावर फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला. तलाठ्याने फेरफार नोंद करून मंजुरीसाठी तो मंडल अधिकारी चोरमलेकडे पाठवला.
दरम्यान, तक्रारदाराच्या बहिणीसह इतर २१ जणांनी या फेरफाराविरोधात हरकत दाखल केली होती. त्यावर चोरमलेने सुनावणी सुरू केली. त्याने फेरफार रद्द करण्यासाठी, जमिनीच्या नोंदी तक्रारदारांच्या नावे करण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली. मंडल अधिकारी मारुती चोरमले याने तक्रारदारांना बारमुख याला भेटण्यास सांगितले. बारमुखने लाचेची मागणी केली. त्यातील स्वतःसाठीचे १० हजार रुपये त्याने फोन पेव्दारे स्वीकारले. चोरमले आणि बारमुख या दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बारमुख याच्यामार्फत व्यवहार करण्यास सांगितले. बारमुखने चोरमलेसाठी दोन लाख व स्वतःसाठी १० हजार रुपये अशी दोन लाख १० हजारांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. त्यावेळी चोरमलेने २ लाख रोख, तर बारमुखने १० हजार ऑनलाईन घेतले.
















