न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि. 17 जुलै 2025) :- बावधन येथे पायी घरी चालत जाणाऱ्या महिलेला तीघांपैकी एकाने ‘मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, तुम्ही मंगळसूत्र घालू नका, आता भरपूर चोऱ्या होत आहेत, बऱ्याच चोरी करणाऱ्या टोळ्या आल्या आहेत’, अस बोलत विश्वासात घेतल.
सोन्याचे मंगळसूत्र व दोन बांगड्या असे दागिने पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा केला. दागिने पर्समध्ये न ठेवता हात चलाखी करीत दिड लाखांचा ऐवज स्वतः घेऊन जावून महिलेची फसवणुक केली.
महिलेने ०३ अनोळखी पुरूषांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून बावधन पोलिस ठाण्यात तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















