- एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 17 जुलै 2025) :- नवीन इमारतीच्या तिस-या मजल्यावर काम चालु असताना दोन कामगार खाली रस्त्यावर पडले. त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
१) चंद्रकांत यशवंत सुतार, वय ५३ वर्षे रा. वडगाव रोड, आळंदी, याच्या डोक्याला मार लागुन गंभीर दुखापत होवुन तो मयत झाला. दुसरा मजूर २) निरहार भिमन्ना मेलकेरी, वय ४३ वर्षे रा. चह्योली (बु) ता. हवेली यांस जबर दुखापत झाली आहे.
ही घटना (दि.१५) सकाळी ०९.५५ वाजताच्या सुमारास अरविंद साळुंखे यांच्या च-होली आळंदी रोड, आळंदी येथील साईटवर घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने इमारतीच्या बाहेरील बाजुने मजूराच्या व पादचा-याच्या सुरक्षेच्या दुष्टीने आवश्यक असणारी संरक्षण जाळी न लावल्याने व मजूराची सुरक्षेची खबरदारी म्हणुन डोक्याला हेल्मेट व हर्नेस न देवुन त्यांच्या जीवीताची योग्य ती खबरदारी न घेतल्याने व निष्काळजीपणा केल्याने हा प्रकार घडला.
राहुल दुधमल पोलीस उपनिरीक्षक (आळंदी पोलीस ठाणे) यांनी आरोपी अब्दुलगफार अब्बास राय वय ५२ वर्षे रा चर्होली खुर्द घोलपवस्ती ता खेड जि पुणे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक नाही.










