न्यूज पीसीएमसी नेटवर्क
राजकोट (दि. २१ जुलै २०२५) :- केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानाने सहायक उपनिरीक्षक (एएसआय) असलेल्या लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात घडली. महिलेच्या हत्येनंतर जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याने पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.
सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या टोकराला येथील दिलीप जाधव मणिपूरमध्ये सीआरपीएफमध्ये असून, तो सुटीसाठी गावी आला होता. त्याची लिव्ह-इन पार्टनर अरुणा जाधव (२५) अंजार पोलिस ठाण्यात साहाय्य उपनिरीक्षक होती. हे दोघे अंजार येथे भाड्याच्या घरात राहात होते. शुक्रवारी रात्री त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी अरुणाने दिलीपच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर रागाच्या भरात दिलीपने अरुणाचा गळा दाबून हत्या केली.
नंतर दिलीपने आत्महत्या प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे दिलीपने पोलिस ठाण्यात जाऊन सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी अंजारा येथील घरातून अरुणाचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती कच्छ पूर्वचे पोलिस अधीक्षक सागर बागमार यांनी दिली.












