- आम आदमी पार्टी शहराध्यक्ष रविराज काळे यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्री-अपरात्री कुत्र्यांचे भुंकणे, अचानक हल्ले होणे, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांवर संभाव्य धोका यामुळे ही समस्या अधिक तीव्र होत आहे.
महत्वाचं म्हणजे अनेक वेळा ही कुत्री – कुत्रा घरातून मुक्त करण्यात येतात, परंतु त्यांच्यावर निर्बिजीकरण, लसीकरण आणि पुनर्वसन न झाल्यामुळे ते पुन्हा रस्त्यावर परत येतात आणि नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण करतात.
पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना व नोंदणी करा. कुत्र्यांचं सिस्टमॅटिक लसीकरण आणि निर्बिजीकरण मोहिम करा. कुत्राघरांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणा. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करा. या विषयाकडे तत्काळ लक्ष द्या अन्यथा मोकाट व भटकी कुत्री आम्ही पालिकेत आणून सोडू. भटक्या प्राण्यांची समस्या ही केवळ सार्वजनिक आरोग्याशी संबंधित नसून ती नागरी हक्कांचाही विषय आहे. वेळेत उपाय न केल्यास ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करू शकते असे आम आदमी पार्टी शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली. या वेळी यल्लाप्पा वालदूर, चंद्रमणी जावळे, कुणाल वक्ते,स्वप्निल जेवले, अजय सिंग, आदी उपस्थित होते.












