- सप्टेंबरपासून काहींना रेशन मिळणार नाही..
- यादीत तुमचं नाव आहे का? त्वरित तपासा!..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २२ जुलै २०२५) :- राज्यातील शिधावाटप प्रणालीमध्ये (रेशन प्रणाली) मोठे बदल होत असून, सप्टेंबर २०२५ पासून अपात्र लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने अनेक अपात्र रेशन कार्डधारकांची यादी तयार केली आहे. त्यामुळे तुमचं नाव या यादीत आहे का, हे त्वरित तपासणं गरजेचं आहे.
काय आहेत बदल?
राज्य सरकारकडून ई-केवायसी (e-KYC), आधार लिंकिंग, आणि मोबाइल क्रमांक पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. याची पूर्तता न केलेल्या किंवा बनावट माहिती दिलेल्या कार्डधारकांना रेशन देण्यात येणार नाही.
तुमचं नाव यादीत आहे का? कसं तपासाल?…
• राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
• ‘अपात्र लाभार्थी यादी’ किंवा ‘RATION CARD STATUS’ या पर्यायावर क्लिक करा
• तुमचं रेशन कार्ड क्रमांक, आधार नंबर किंवा मोबाइल नंबर टाका
• तुमचं कार्ड वैध आहे की नाही, याची माहिती स्क्रीनवर दिसेल
जर नाव यादीत असेल तर काय कराल?
• जवळच्या रेशन कार्यालयात भेट द्या
• आवश्यक त्या कागदपत्रांसह पुन्हा पात्रता सिद्ध करा
• ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
महत्वाचे:
सप्टेंबरनंतर रेशन बंद झाल्यास याची जबाबदारी स्वतः कार्डधारकाची असेल. त्यामुळे लवकरात लवकर तुमची माहिती तपासून घ्या.
तपासणीसाठी संकेतस्थळ: www.mahafood.gov.in












