न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील लिपिक गौंडर लोकेश सुब्रम्हण्यम हे २७ ऑगस्ट २०२४ पासून विनापरवाना रजेवर असून, ते आजतागायत कामावर हजर झालेले नाहीत. या गैरहजेरीबाबत त्यांना ५०० रुपयांचा दंडही करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
ते प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असून, सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्तीवेतन आणि अन्य कामकाज पाहतात. मात्र, त्यांच्या दीर्घ गैरहजेरीमुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली, पण त्यांनी कोणताही खुलासा दिला नाही. त्यांच्या ३३४ दिवसांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे, कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष केल्याचे मानत आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.











