- दोन महिन्यात ५७४ कारवाया; २५ लाखांहून अधिक दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या विविध उल्लंघनांवर जून आणि जुलै २०२५ या दोन महिन्यांत महापालिकेच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे.
शुभम उद्योग या ठेकदार एजन्सीमार्फत केलेल्या संयुक्त मोहिमेत तब्बल ५७४ कारवाया करून सुमारे २७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बांधकाम प्रकल्पांमुळे वायू प्रदूषण वाढू नये यासाठी झाकलेली वाहने, स्वच्छ वाहने, चाके धुण्याची व्यवस्था, वॉटर फॉगिंग, ग्रीन नेट, मेटल शीट आदी नियमांचे पालन बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आढळून आले.
तसेच, रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी कचरा व बांधकाम साहित्य टाकणे, प्लास्टिकचा वापर, डासांची उत्पत्ती, RMC प्लॉट्स संदर्भातील नियम उल्लंघन अशा विविध बाबींवरही कारवाई झाली आहे.
महापालिकेने पर्यावरण नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतल्याने भविष्यात बांधकाम क्षेत्रात नियमबद्धता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढीलप्रमाणे कारवाया करण्यात आल्या…
- बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली नाहीत. बांधकाम साहित्य आणि कचरा रोडवर / सार्वजनिक ठिकाणी टाकणे. बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने स्वच्छ नाहीत तसेच चाके धुण्याची व्यवस्था नाही. एकुण चार कारवाई, ऐंशी हजार दंड वसुल.
- संपूण RMC प्लॉट बंद केलेला नाही. (किमान ३० फुट उंची) क्रॉक्रीट कचऱ्याची विल्हेवाट RMC ने लावलेली नाही, एकुण दोन कारवाई, तीस हजार दंड वसुल.
- रस्त्यांवर कचरा टाकणे एकुण २०६ कारवाई, तब्बल ४,१५,००० दंड वसुल.
- डासांची उत्पत्ती करणे, एकुण तेरा कारवाई, तेरा हजार दंड वसुल.
- बंदी असलेल्या प्लॉस्टिकचा वापर (संस्थात्मक) एकुण एकशे चाळीस कारवाई, सात लाख श्याहत्तर हजार पाचशे दंड वसुल.
- बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान 30 फुट उंचीचे मेटल शीट उभारले नाहीत. एकुण तीन कारवाई, पाऊण लाखांचा दंड वसुल.
- बांधकाम साहित्य आणि कचरा रोडवर / सार्वजनिक ठिकाणी टाकणे. एकुण सहा कारवाई, ५३००० हजार दंड वसुल.
- बांधकाम साहित्य वाहून देणारी वाहने स्वच्छ नाहीत तसेच चाके धुण्याची व्यवस्था नाही. एकुण पंधरा कारवाई, १३४००० दंड वसुल.
- बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली नाहीत. एकुण ५६ कारवाई, १६२००० दंड वसुल.
- बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना वॉटर फॉगिंग मशिनचा वापर करत नाही. एकुण चार कारवाई, चाळीस हजार दंड वसुल.
- बांधकामास सर्व बाजूंनी ओल्या हिरव्या कपड्याने बंद केलेले नाही. एकुण १० कारवाई, २४५००० दंड वसुल.
- राडारोडा सार्वजनिक ठिकाणी टाकणे (C&D). एकुण १०५ कारवाई, ५७१००० दंड वसुल.
- वायु प्रदूषण उपायांचे पालन न करणे. एकुण आठ कारवाई,
११०००० दंड वसुल. - सर्व कामाच्या ठिकाणी बंदिस्त क्षेत्रात ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगचे काम नियमाप्रमाणे केले जात नाही. वॉटर फॉगिंग नाही. एकुण दोन कारवाई, १०००० दंड वसुल.












