न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- समता भ्रातृ मंडळाच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी लेवा पाटीदार समाजाचा शैक्षणिक बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
राष्ट्रगीत, गणेश वंदना व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बालगोपाळांसाठी दहीहंडीचे आयोजन करून प्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात २०० हून अधिक गुणवंत मुलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्योजक विलास बोरोले, डॉ. प्रा. आशिष पाटील, डॉ. प्रा. लीना चौधरी, डॉ. प्रा. निवृत्ती नारखेडे, मा. नामदेव ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलांना प्रा. आशिष पाटील, प्रा. लीना चौधरी व प्रा. निवृत्ती नारखेडे यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अन्नदाते विलास बोरोले व संगीताताई बोरोले यांचा विशेष सत्कार झाला. मंडळाचे अध्यक्ष हेमंत झोपे यांनी दरवर्षीचे देणगीदार व आर्थिक आधारस्तंभांचा गौरव करून समाजाच्या एकतेचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी पालकांना शैक्षणिक देणगीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन पुनम चौधरी व डॉ. निनाद वायकोळे यांनी केले तर आभार सचिन चौधरी यांनी मानले. पालक व मुलांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाला लाभला.










