न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. २० ऑगस्ट २०२५) :- रावेत येथील देवकर प्लाझा बिल्डींग मध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने तब्बल ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देवकर दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विशाल लक्ष्मण ओव्हाळ (वय ३२, रा. वाकड, पुणे) यांच्या तक्रारीवरून रावेत पोलिसांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तसेच त्यांच्या मित्रांकडून आरोपींनी विश्वास संपादन करून धनादेश व आरटीजीएसद्वारे मोठी रक्कम स्वीकारली. मात्र संबंधित फ्लॅटचे बांधकाम पूर्ण न करता ताबा न देता फसवणूक केली.
या प्रकरणी आरोपी अनिल दत्तात्रय देवकर व त्यांची पत्नी (रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप आरोपी अटकेत नाहीत.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी मोठी रक्कम स्वीकारूनही फ्लॅटचा ताबा न देता ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि तक्रार करणाऱ्याला धमकावले. याबाबत पोलिसांत तक्रार होताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. राहुल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रावेत पोलीस ठाणे येथे सुरू आहे.












