न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २१ ऑगस्ट २०२५) :- सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज (कमला एज्युकेशन सोसायटी) यांच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
क्विक हील फाउंडेशनच्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी येथे हा अभियान राबविण्यात आला.
या जनजागृती मोहिमेत प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत माहिती दिली. विशेषतः संशयास्पद लिंक, ओटीपी शेअर करणे, अनोळखी कॉल्स व ईमेलद्वारे होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात जागरूकता करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मोहिमेत विद्यार्थिनी मानसी वाडेकर आणि श्रावणी सावंत यांनी प्रत्यक्ष जनजागृती केली. प्रकल्प समन्वयक डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी क्विक हील सीएसआर एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के, गायत्री केसकर व दिपू सिंह यांचेही योगदान लाभले.












