- कायमस्वरूपी उपाययोजना राबवा – सागर कोकणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २९ ऑगस्ट २०२५) :- रहाटणी परिसरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीज खंडितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत स्वीकृत नगरसेवक सागर खंडुशेठ कोकणे यांनी महावितरणकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
अंबिका कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, वैष्णवी कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, अध्यक्षनगर कॉलनी, आईजाई कॉलनी तसेच जय भवानी चौक परिसरातील नागरिक वारंवार वीज खंडितीमुळे त्रस्त झाले आहेत.
कोकणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “वीज खंडित झाल्यानंतर तांत्रिक दुरुस्ती केली जाते, मात्र त्यानंतरही वीजपुरवठा नियमित होत नाही. नागरिक वेळेवर वीज बिल भरतात, त्यामुळे महावितरणने वीज भारनुसार केबल व ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी.”
नागरिकांनी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी दिल्या असून, आता तरी ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.













