न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२५) : चिंचवड येथील न्यू सोनिगरा ज्वेलर्समध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने तब्बल एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
फिर्यादी अरविंद सोनिगरा (वय ५१, रा. चिंचवड) यांच्या दुकानात जुलै महिन्यात एक इसम ग्राहक बनून आला. त्याने सोन्याचे दागिने पाहून खरेदीसाठी ठेवून घेण्याची विनंती केली. मात्र, दागिने घेऊन तो पसार झाला.
या प्रकारात सोनाराचा तब्बल एक ३० हजार रुपयांचा तोटा झाला. पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी अमोल सुभाष बलदोटा (वय ३३, रा. धनकवडी, पुणे) याला अटक केली.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधे करत आहेत.













