न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. नवीन आयशर आणि स्विफ्ट डिझायर कार ही दोन वाहने अपघातग्रस्त झाली आहेत. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून एकाचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघात एवढा भीषण होता की गाडीत अडकलेले प्रवासी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना विशेष प्रयत्न करावे लागले. दोघांचे पाय तर, एक व्यक्ती गाडीमध्येच अडकलेली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, गाडीतील प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघातस्थळी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे भक्ती-शक्ती परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून, पुढील तपास सुरू आहे.
















