न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- पुनावळे येथील प्रज्ञेशा सुहास गार्डी हिने बारावीच्या परीक्षेत ९०.३० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ़ कॉमर्समध्ये ती शिकत आहे.
भविष्यात सीए होण्याची इच्छा तीने व्यक्त केली. दि इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकांटंट ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष सुहास गार्डी यांची ती कन्या आहे.











