न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ५ सप्टेंबर २०२५) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या घरावर टोळक्याने हल्ला करून घरफोडी केली तसेच गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी सुरज जयसिंग जाधव (वय १८, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.३५ वाजता आरोपी प्रतिक जावळे, ऋषिकेश लष्करे, प्रितम जावळे, देवांश ऊर्फ ईल्या, साहिल तुपसौंदर, शुभम ऊर्फ भुत्या शिंदे, अनुजकुमार, निखील कांबळे, अनुज जाधव, प्रेम शर्मा, प्रेम शिंदे व भुर्या (विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी मिळून हल्ला केला.
आरोपींनी हातातील लोखंडी रॉड, काठ्या व दगडाने दहशत निर्माण केली. घराचे दरवाजे फोडले, घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. तसेच फिर्यादीच्या यामाहा या दुचाकीचे टाकीवर मारून नुकसान केले. आरोपींनी शिवीगाळ, धमक्या देत फिर्यादीच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षांच्या काचा फोडल्या.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी क्रमांक २, ५, ८ व १० यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोउपनि इंगळे करत आहेत.











