न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२५ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनतर्फे प्रभाग क्रमांक १७ चिंचवडवडेनगर येथे गेल्या सात वर्षांपासून गणेश विसर्जन हौदाची सोय करण्यात येत आहे. या उपक्रमाला गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दरवर्षी प्रभागातून सुमारे १५ ते १६ हजार मूर्ती विसर्जित केल्या जातात.
नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनतर्फे शाडू मातीच्या मूर्तींची विक्री ‘नफा-तोटा नाही’ या तत्वावर सुरू करण्यात आली आहे. विसर्जित झालेल्या मूर्ती महापालिकेचे कर्मचारी खाणीमध्ये नेऊन व्यवस्थित विसर्जित करतात.
“गणेशभक्तांनी थेट नदीत मूर्ती विसर्जन न करता हौदातच विसर्जन करावे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी केले.











