न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०१९) :- शिवशाही व्यापारीसंघ विधी व न्याय आघाडीच्या मुंबई व कोकण विभागा अध्यक्षपदी निवडीची घोषना प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी नुकतीच केली. शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या सुचनेनुसार व प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलेंगेकर यांच्या अनुमोदनाने श्रध्दाताई शुभेन्दु रूदो यांची या पदासाठी निवड करण्यात आली.
पक्षाच्या माध्यमातून विधी व न्याय अघाडीच्या मुंबई व कोकण विभागप्रमुख श्रध्दाताई शुभेन्दु रूदो यांना सर्वसामान्य जनतेसाठी व व्यापारी बांधवांच्या तसेच दिव्यांग तसेच विधवा माता-भगिनींप्रती कटिबद्ध राहून, सेवा करण्याच्या सूचना प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी यावेळी केल्या.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, रोमी संधू, खंडु शिरसाट, प्रदेश खजिनदार नवनाथ माऊली जाधव, महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्षा सुनिताताई खंडाळकर, संगिताताई तेलकुटे, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, रमेश दाखले, रविकिरण घटकार, निलेश भोरे, आशिष वाळके, गणेश पाडुळे, रोहीत विभुत्ते, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विशाल बाविस्कर, संदिप खुंटे, सागर शिंदे, भरत इंगळे, दिपक कांबळे, नितीन येडके, कष्टकऱ्याचे नेते बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे, नगरसेवक दिपक मेवानी, राजेश पिल्ले, उल्लासनगर विभागप्रमुख कृष्णा गायकवाड, आकाश घटकार, सौरभ शेंडगे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.











