- अशी होणार प्रभागनिहाय नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी..
- महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 08 सप्टेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी केलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी येत्या बुधवारी (दि. १० सप्टेंबर २०२५) होणार आहे. ही सुनावणी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत अधिकारी वि. दराडे, भा.प्र.से., प्रधान सचिव, सहकार व पणन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
सुनावणीचे ठिकाण ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट लिमिटेड, एच. ब्लॉक, डीमार्ट मागे, चिंचवड, पुणे असे निश्चित करण्यात आले आहे.
नागरिकांनी उपस्थित राहणे बंधनकारक…
महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत. त्यानुसार, संबंधित नागरिकांना निश्चित वेळापत्रकानुसार सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान नागरिकांनी आपले हरकत क्रमांक, नोटीस व ओळखपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
प्रभागनिहाय सुनावणी वेळापत्रक…















