न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. १३ सप्टेंबर २०२५) :- आळंदी-चाकण रोडवर पोलिसांनी कारवाई करून एका युवकाला अनैतिक व्यवसाय प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश भिमराव कबले (वय २४, रा. रांजनगाव, जि. पुणे. मूळ पत्ता हिंगोली) असे आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका पीडितेस पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यातून मिळणाऱ्या रकमेवर तो स्वतःची उपजीविका चालवत होता.
कारवाईदरम्यान पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्याद पोलीस शिपाई उदयकुमार बाळासाहेब भोसले, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पिंपरी-चिंचवड यांनी दिली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई वपोनि नरके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.













