- महिला कामगाराशी गैरवर्तन, मालकाला मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे एमआयडीसी, (दि. १८ सप्टेंबर २०२५) :- वराळे (ता. खेड) येथील श्रेयष हॉटेलमध्ये दहशत माजवणारा आरोपी नागेश गोपिनाथ शिंदे (३९, रा. रोहकल, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.
१७ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता आरोपीने हॉटेलमध्ये प्रवेश करून, “मी या एरियातील भाई आहे, तुला हॉटेल चालवायचे असेल तर दर महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी दिली. त्याचबरोबर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेचा हात पकडून अंगाजवळ ओढत तिच्यासोबत मानहानीकारक प्रकार केला. फिर्यादी गणेश बाबाजी डुंबरे (३१) व कामगार राम तळेकर यांना आरोपीने मारहाण करत, पैसे न दिल्यास हॉटेल चालू देणार नाही, अशी दमदाटी केली.
या प्रकरणी गणेश डुंबरे यांच्या फिर्यादीवरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्रसिंग परदेशी करत आहेत.












