- विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; स्वच्छता, पर्यावरण व आरोग्य संवर्धनाचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत स्वच्छता अभियान, पर्यावरणपूरक उपक्रम तसेच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवाराची व वर्गांची स्वच्छता केली, झाडांचे सुशोभीकरण केले व “स्वच्छ-हरित पर्यावरण” या संदेशाचा प्रसार केला. या उपक्रमाला वर्गशिक्षिकांनी मार्गदर्शन केले. यावेळी “झाडे लावा झाडे वाचवा”, “पृथ्वी वाचवा”, “प्रदूषणमुक्त शहर” आदी संकल्पनांवर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लहानग्या विद्यार्थ्यांनी रंगरेषांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
शाळेत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमार्फत मोफत आरोग्य तपासणी व ए.एस.जी.आय. हॉस्पिटलमार्फत मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला पालकांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला.
या विशेष उपक्रमास संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डिंपल काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्मिला ठोंबरे यांनी मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.













