- अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना रोजगाराची नवी संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २० सप्टेंबर २०२५) :- अनुसूचित जाती कल्याण समितीच्या पुणे जिल्हा दौऱ्यादरम्यान महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महावितरण विभागातील २८१ नियुक्त्यांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील ५६ उमेदवारांना नुकतीच समिती अध्यक्ष नारायण कुचे, आमदार अमित गोरखे व इतर सदस्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. नियुक्त्यांबाबत बोलताना समिती अध्यक्ष नारायण कुचे व आमदार अमित गोरखे म्हणाले, “या नियुक्त्यांमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना न्याय मिळाला असून रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. हा उपक्रम वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.”
या दौऱ्यात समितीमार्फत पदोन्नती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे. तसेच विविध कल्याणकारी योजना आणि विकासकामांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पाहणीद्वारे तपासली जाणार आहे.
या समितीत आमदार अमोल मिटकरी, तानाजी मुटकुळे, भिमराव केराम, अशोक माने, श्याम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, संजय बनसोडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम व प्रज्ञा सातव यांचा सहभाग आहे.
या दौऱ्यामुळे अनुसूचित जाती समाजाच्या विविध प्रश्नांवर ठोस कार्यवाहीसाठी प्रशासनाला स्पष्ट दिशा मिळणार आहे.












