न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० सप्टेंबर २०२५) :- भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन रविवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डन, कोकणे चौक येथून सुरू होऊन ८ टु ८० पार्क येथे संपन्न होईल.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष दिनेश यादव, सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, संयोजक अमृत मारणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही मॅरेथॉन सर्व वयोगटांसाठी विनामूल्य असून, युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश, देशभक्तीची भावना आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा प्रमुख उद्देश आहे. “युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केले आहे.












