न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ सप्टेंबर २०२५) :- बैलांची सजावट करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली .पांरपारिक वाद्ये व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली. चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीत गणेश किसन आप्पा यादव यांच्या बैलजोडीने सहभाग घेतला.
कुदळवाडी चिखली येथील किसन आप्पा यादव यांच्या साठ वर्षापासून बैल जोडीची मिरवणूक काडून बैल पोळा साजरा करत आहेत. सध्या आधुनिकीकरणामुळे आणि स्मार्ट सिटी झाल्याने घराचे दर गगनाला भिडलेले आहेत नागरिकांना गाडी लावण्यासाठी जागा शिल्लक राहीलेली नाही तर जनावरे पाळणे दूरच राहिले. आम्ही सर्जा राजाची जोडी फक्त हौसे खातर पाळत असून सध्या शेती शिल्लक राहिलेली नसल्याने बैलासाठी वेगळी जागा केली असून सर्जा राजाचा स्वभाव गरीब असून आम्ही सर्वजण त्याची देखभाल करत असतात असे किसन आप्पा यादव यांनी सांगितले .
यादव म्हणाले की नातवंडे ही एरवी बैलांच्या पाठीवर बसुन खेळतात सर्जाराजा लहान मुलांना कुठलीही इजा करत नाही .सर्व कुटुंबातील सदस्य सर्जा राजाची वर्षभर काळजी घेतात आणि बैलपोळ्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो.
                                                                    
                        		                    
							












