- शिक्षण, अनुभव व सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली असून, चार नवे सहायक आयुक्त महापालिका सेवेत उपलब्ध झाले आहेत. राजीव घुले, रामाराम सरगर, परशुराम वाघमोडे आणि दशरथ कांबळे ही नावे यामध्ये आहेत.
सदर पदोन्नतीसाठी महापालिकेने शैक्षणिक पात्रता, अनुभव, सेवा ज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता तसेच शिस्तभंग नोंदींचा विचार केला. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पदोन्नती मंजूर केली.
नव्या सहायक आयुक्तांकडे कोणत्या विभागाची व क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली जाणार, याकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.













