- ड, क आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक संख्या…
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्रात अंतर्गत निळ्या पुरेरेषेत येणाऱ्या अनधिकृत बांधकामांची यादी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर यांच्या आदेशानुसार आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्फे सखोल पाहणी करून संबंधित यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत एकूण १,६८६ अनधिकृत बांधकामे आढळून आली असून त्यामध्ये व्यावसायिक दुकाने, रहिवासी घरे, पत्राशेड, आरसीसी बांधकामे, कच्च्या विटांची घरे तसेच भंगार दुकाने यांचा समावेश आहे.
नदीपात्रातील निळ्या पुरेरेषेत येणारी ही बांधकामे पूरप्रवण क्षेत्रात असल्यामुळे येथील अनधिकृत बांधकामांबाबत कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार अथवा नोंदणी होऊ नये तसेच सामान्य नागरिकांची फसवणूक टाळली जावी यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार बाधित बांधकामांची यादी तयार करून दुय्यम निबंधक, पुणे कार्यालयास सादर करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामार्फत संबंधित अनधिकृत बांधकामांवर नोटीस देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या नदीपात्रातील निळ्या पुरेरेषेत येणाऱ्या अनधिकृत बांधकामांपासून दूर राहावे, आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक ती शासकीय पडताळणी करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
निळ्या पुरेरेषेमधील अनधिकृत बांधकामांची माहिती…
क्षेत्र दिलेल्या नोटिसांची संख्या बाधित भागाची ठिकाणे
- अ १६८ भाटनगर, पिंपरी स्टेशन, पिंपरी मेन मार्केट
- ब ३१२ वाल्हेकरवाडी, भोंडवे कॉर्नर,, रावेत, केशवनगर, कासारवाडी
- क ३३१ रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी,मोईफाटा, कुदळवाडी
- ड ३९१ वाकड गावठाण, पिंपळे सौदागर,, रहाटणी, पिंपळे निलख
- ई ५९ मोशी टोलनाका, दाभाडे वस्ती, डूडूळगाव गावठाण
- फ ८६ डिफेन्स कॉलनी, बग वस्ती, पाटीलनगर
- ग १७५ पिंपरीगाव, पिंपरी वाघेरे, सुभाषनगर, संजयगांधी नगर
- ह १६४ सांगवी, दापोडी, कासारवाडी
- एकूण संख्या : १६८६












