न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेशेजारील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती परिसरात अहिल्यादेवी होळकर समाजकल्याण भवन उभारणीसाठी प्रयत्न करावेत, असे शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश पाडुळे, दिपक रूपनवर, आविनाश कदम, वारकरी सेना शहरप्रमुख तथा मनसे चिञपटसेना शहर सचिव तुकाराम महाराज शिंदे, संपत पाडुळे, किरण पाडुळे, आकक्ष थोरात, अभिजीत शेंडगे, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, दिपक कांबळे आदी उपस्थित होते.











