न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील उच्च माध्यमिकचा (बारावी) वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. तर शास्त्र शाखेचा निकाल नव्यानव टक्के लागला आहे. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी यशस्वी विद्यार्थी व मुख्याध्यापक संदीप पाटील यांचे अभिनंदन केले.
सचिव व्ही. एस. काळभोर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, एस.बी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, लेखाधिकारी सुभाष कानिटकर, कार्यालय अधिक्षक आदित्य उपासनी आदी उपस्थित होते.
वाणिज्य शाखेतून या वर्षी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेस बसलेले सर्व शहान्नव विद्यार्थी पास झाले. तर शास्त्र शाखेस १८८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १८७ विद्यार्थी पास झाले. वाणिज्य विभागाच्या आकाश महेंद्र भुजंग (८७.६९%), पौर्णिमा रविंद्र आरगडे (८४ %), स्टेफी सायमन शेट्टी (८२ %) आणि शास्त्र शाखेचे कविता सत्यवान साहू (८९.३ %), स्नेहा संजय पाटील (७८ %), प्रतिक निरज आगरवाल (७७ %) यांचा विशेष गौरव करण्यात आला.











