न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी | बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ :- दिघी आळंदी रोडवरील परिसरात असलेल्या अगत्य लॉजमध्ये अनैतिक वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत एक आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी चंद्रकांत खंडु पारधी (वय ३६, पोहवा/१७२४, रा. भोसरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर तापकीर, अर्जुन रंधवे, मकसुद आणि धर्मेंद्र श्रीराममिलन वर्मा यांनी चार महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. आरोपी महिलांकडून मिळणाऱ्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.