न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुगाव (दि. १२ ऑक्टोबर २०२५) :- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पुर्व प्राथमिक विभागाच्या वतीने “Mathematics is all about“ या उपक्रमाच्या माध्यमातुन पूर्वप्राथमिक गटापासुनच विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड व गोडी लागावी यासाठी विविध गणितीय संकल्पनांची माहिती देणारे प्रयोग व प्रकल्प करण्यात आले.
हे गणितीय प्रकल्प साकारण्यासाठी आदरणीय प्राचार्या डॉ. कविता अय्यर व पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुब्बलक्ष्मी अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विशेष कष्ट घेतले. सर्व पालकांनी या सर्व प्रकल्पांचे व शिक्षकांच्या या कल्पकतेचे मनापासुन कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक नारायण चिंचाणे व आदर्श शिक्षिका उषाताई भोईटे यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. याप्रसंगी उषाताई भोईटे व चिंचाणे सर यांनी “गणित हा विषय प्रत्यक्ष कृतीतून व खेळातून तो मुलांना शिकवला तर त्या विषयाची मुलांना अधिक आवडू लागतो. त्या विषयातील संकल्पाना व्यवस्थिपणे समजण्यास मदत होते. या ठिकाणी शाळेतील सर्व शिक्षकांनी केलेले प्रकल्प अतिशय कल्पकतेने केले असुन शिक्षणक्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारी ही शाळा आहे. कारण शाळेतील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थी मनातील जिज्ञासा वाढविणारा व त्यांना विचारप्रवण करणारा आहे.” या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संस्स्थेचे उपाध्यक्ष अशोक कंद, सचिव प्रा. विकास कंद, संचालक सौरभ कंद, कोमल सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका मनिषा जाधव व निशा आढावे यांनी केले. आभार पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुब्बलक्ष्मी पाठक यांनी व्यक्त केले.