- पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तब्बल १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त श्वेता खेडकर यांनी शुक्रवार (दि. १०) रात्री उशिरा याबाबतचे आदेश जारी केले.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे…
- नीलेश वाघमारे — दापोडी पोलिस ठाणे येथून वाहतूक शाखेत
- रणजित जाधव — तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे येथून वाहतूक शाखेत
- संजय चव्हाण — विशेष शाखेतून निगडी पोलिस ठाण्यात
- महेंद्र कदम — वाहतूक शाखेतून नियंत्रण कक्षात
- संतोष पाटील — गुन्हे शाखेतून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात
- विनोद पाटील — गुन्हे शाखेतून चाकण पोलिस ठाण्यात
- नीता गायकवाड — वाकड पोलिस ठाण्यातून वाहतूक शाखेत
- महेश पाटील — नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत
- नाथा घार्गे — चाकण पोलिस ठाण्यातून भोसरी पोलिस ठाण्यात
- रामचंद्र घाडगे — नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत
- भोजराज मिसाळ — निगडी पोलिस ठाण्यातून भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात
- प्रदीप पाटील — वाहतूक शाखेतून दापोडी पोलिस ठाण्यात
- भारत शिंदे — भोसरी पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात
या बदल्यांमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कामकाजात नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.