न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात रमाई आवास योजनेचा लाभ गरिबांना व्हावा, यासाठी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेने प्रयत्न सुरू केले आहेत.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याशी चर्चा करून ही योजना अंमलात आणली जाणार आहे. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याने रमाई आवास योजनेतील १२० घरांच्या मागण्यांपैकी ५० घरांची यादी महापालिकेने मान्य केली आहे. यामध्ये भोसरी येथील बालाजीनगर, चिंचवड येथील आनंदनगर, चिखली येथील भीमशक्तीनगर यांचा समावेश आहे.













